22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरपंचकट्टा ते राणी लक्ष्मीबाई मंडईपर्यंतचे अतिक्रमण महापालिकेने हटविले

पंचकट्टा ते राणी लक्ष्मीबाई मंडईपर्यंतचे अतिक्रमण महापालिकेने हटविले

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्यानिमित्ताने महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पंचकट्टा ते राणी लक्ष्मीबाई मंडईपर्यंतचे अतिक्रमण हटवले. रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे खोके, पत्रे, छत्र्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून नंदीध्वज मार्गावरील श्री सिध्देश्वर मंदिर परिसरातील पंचकट्टा ते राणी लक्ष्मीबाई मंडईपर्यंतचे रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे तसेच फुटपाथवरील अतिक्रमण गुरुवारी काढण्यात आले.
राणी लक्ष्मीबाई मंडई परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी दोन खोके जप्त करण्यात आले तसेच रस्त्यावरील पत्रे, प्लास्टिक बाटल्या, लोखंडी वजन काटे, गाडगी, मटके व इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले. रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या छत्र्या निष्कासित करण्यात आल्या, त्यानंतर कोनापुरे चाळ परिसरात कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त नंदीध्वज मार्गावर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. नागरिकांनी या मार्गावर कुठेही अडथळा करू नये. नियमानुसारच आपापल्या जागेतच व्यवसाय करावा. स्वच्छ सोलापूर-सुंदर सोलापूर व अतिक्रमणमुक्त सोलापूरसाठी शहरातील नागरिकांनी महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR