21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रएप्रिलमध्ये होणार मनपा, जि. प. च्या निवडणुका?

एप्रिलमध्ये होणार मनपा, जि. प. च्या निवडणुका?

राज्यात राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध कार्यकर्ते व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना लागले आहेत. आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. २२ जानेवारी रोजी ही सुनावणी होत असून अंतिम सुनावणी व्हावी, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यात जवळपास २९ महागनरपालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समित्यांवर सध्या प्रशासक काम करत असून गेल्या २ वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून प्रशासक नेमण्यात आल्याने स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना राज्य पातळीवर वेग आला असून लवकरच राज्य निवडणूक आयुक्त यासंबंधी घोषणा करू शकतात.

सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, याच महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यातच ही सुनावणी अंतिम व्हावी, यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता वेग आल्याचे दिसून आले. साधारणत: एप्रिल महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठीच राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची शिफारस केली जाणार आहे.

महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला
विधानसभा निवडणुकांच्या विजयी जल्लोषानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांचा विजयी गुलाल उधळण्याची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू होईल. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला दैदिप्यमान यश मिळाल्याने महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR