33.8 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeराष्ट्रीयवयाच्या १८ व्या वर्षी मुस्कान-सौरभने केले होते लग्न

वयाच्या १८ व्या वर्षी मुस्कान-सौरभने केले होते लग्न

मेरठ : मेरठच्या सौरभ हत्याकांडाची सर्वत्र चर्चा होत आहे. पत्नी मुस्कानने तिचा प्रियकर साहिलसोबत मिळून पती सौरभची हत्या केली. याच दरम्यान, मुस्कान आणि सौरभच्या नात्याबद्दल आणखी एक सत्य समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. मुस्कानच्या आईच्या म्हणण्यानुसार, मुस्कान आणि सौरभ ११-१२ वर्षांचे होते तेव्हाच त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.

मुस्कानचे आजोबा ब्रह्मपुरीमध्ये ज्योतिषी म्हणून काम करायचे. सौरभचे कुटुंब ब्रह्मपुरीमध्ये राहत होते आणि त्याच्या आईचा ज्योतिषावर खूप विश्वास होता. त्या अनेकदा मुस्कानच्या आजोबांच्या घरी कुंडली दाखवण्यासाठी जायच्या. त्यावेळी त्या सौरभला सोबत घेऊन जात असे. मुस्कान तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. त्यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली, जी हळूहळू प्रेमात बदलली.

लग्न करण्याचा निर्णय
मुस्कान आणि सौरभ दोघेही लहानपणापासूनच लग्न करू इच्छित होते. १८ वर्षांचे झाल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा दोघांनीही आपापल्या कुटुंबांना लग्नाबद्दल सांगितले. तेव्हा दोन्ही कुटुंबांनी स्पष्टपणे नकार दिला आणि त्यांना समजण्याचा खूप प्रयत्न केला. मुस्कान आणि सौरभने कुटुंबीयांचे ऐकले नाही आणि लग्न करण्यावर ठाम राहिले.

मुस्कान सौरभसोबत पळून गेली
एके दिवशी दुपारी मुस्कान घरातून पळून गेली आणि दोन दिवस तिचा पत्ता लागला नाही. नंतर, कुटुंबाला समजले की मुस्कान सौरभसोबत पळून गेली आहे. दोन दिवसांनी पोलिसांच्या मदतीने दोघांनाही घरी परत आणण्यात आले. यानंतर मुस्कान आणि सौरभ पुन्हा एकदा घरातून पळून गेले, पण परत आले.

वयाच्या १८ व्या वर्षी झाले लग्न
मुस्कानच्या आईने सांगितले की, वयाच्या १८ व्या वर्षी लग्न झालं. एके दिवशी पहाटे ५ वाजता मुस्कान सौरभसोबत घरातून पळून गेली. नंतर दोघांनी लग्न केल्याचं समोर आले. यानंतर सौरभच्या कुटुंबीयांनी तिला घराबाहेर काढले. तेव्हापासून दोघेही भाड्याच्या घरात राहत होते. मुस्कानला हिरोईन होण्याचे वेड होते. हिरोईन होण्यासाठीही मुस्कान घरातून पळून गेली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR