24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयगाझा संदर्भात सौदी अरेबियात मुस्लिम देश एकत्र

गाझा संदर्भात सौदी अरेबियात मुस्लिम देश एकत्र

रियाध : हमास आणि इस्राईलमध्ये संघर्ष अजून सुरूच असून या संघर्षाची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. गाझा संदर्भात सौदी अरेबियात मुस्लिम देश एकत्र जमले आहेत. यामध्ये अरब जगतातील आणि मुस्लिम देशांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. या मेळाव्याला ‘इमर्जन्सी समिट’ असे संबोधले जात असून हे सर्व नेते गाझामधील युद्ध संपविण्याचे एकत्रित आवाहन करणार आहेत. यापूर्वी दोन स्वतंत्र कार्यक्रम होणार होते. अरब लीगची परिषद शनिवारी होणार होती आणि इस्लामिक सहकार्य संघटनेची (ओआयसी) बैठक रविवारी होणार होती. या परिषदेची विशेष बाब म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसीही यात सहभागी झाले आहेत.

इराण आणि सौदी अरेबियाचे हितसंबंध आपसात भिडले आहेत, परंतु मार्चमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यात या मुद्यावरून एकमत झाले आहे. रियाधला रवाना होण्यापूर्वी तेहरान विमानतळावर रायसी म्हणाले की, ‘चर्चेची वेळ निघून गेली आहे.’ आता कारवाई करण्याची वेळ आली आहे. मात्र, या परिषदेत असे काही घडू नये यासाठी सौदी अरेबियाचे राज्यकर्ते चिंतेत असल्याचे बोलले जात आहे. असे काही झाल्यास या भागातील तणाव आणखी वाढू शकतो, असे मानले जात आहे.

गाझामधील मृत्यू कसे थांबवायचे, सामान्य लोकांचे दुःख कसे दूर करायचे आणि गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे प्रादेशिक युद्धात रूपांतर कसे होऊ नये या मुख्य समस्या समस्यांचे चिंतन होणार आहे. दरम्यान, गाझातील पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या संघटनेने या परिषदेचा समाचार घेतला आहे. या संघटनेने विचारले की, युद्धाला ३५ दिवस झाले असताना याला आपत्कालीन परिषद कशी म्हणता येईल? संघटनेने म्हटले आहे की, या संमेलनात शाब्दिक संमेलनापेक्षा अधिक काहीतरी होईल अशी आशा आहे.

आयसीयूला लक्ष्य; नागरिकांवर गोळ्या झाडल्या
हॉस्पिटलच्या आयसीयूला लक्ष्य करून हॉस्पिटलमधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गोळ्या झाडल्या गेल्याचे दावे करण्यात येत आहेत. इस्राईली लष्कराने (आयडीएफ) यावर म्हटले आहे की, चालू असलेल्या क्रियाकलापांमधून विशिष्ट घटनांची पुष्टी करू शकत नाहीत, परंतु गाझाच्या उत्तर क्षेत्रात हमास विरुद्ध जोरदार लढा चालू आहे. आयडीएफने म्हटले आहे की,“संपूर्ण गाझा पट्टीमध्ये हमासविरुद्ध लढा सुरू आहे. सध्या उत्तर भागात हमास विरुद्ध भीषण संघर्ष चालू आहे.

काही वेळासाठी लढाई थांबली
जबलिया शरणार्थी कॅम्प परिसरात काही वेळासाठी लढाई थांबल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. जेणेकरून सामान्य लोक येथून दक्षिणेकडे जाऊ शकतील, असे आयडीएफने म्हटले आहे. इस्रायली सैन्याने देखील पुष्टी केली आहे की, गाझाकडे जाणारा मुख्य रस्ता शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत खुला करण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR