24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्यात छताचे प्लास्टर पडून माय-लेक जखमी

ठाण्यात छताचे प्लास्टर पडून माय-लेक जखमी

ठाणे :
लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ या ठिकाणी असलेल्या तळ अधिक एक मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळमजल्याच्या रूममधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे माय-लेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिका-यांनी दिली.

लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ येथील माय-लेक छताचे प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ. योगेश यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. यातील रूम नंबर ०१ मधील प्लास्टर पडले असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. तेथे जखमी वारंग कुटुंब भाड्याने राहत आहे. तसेच त्या चाळीचे बांधकाम अंदाजे २० ते २५ वर्षे जुने आहे. या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR