22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमाझ्या नणंदबाईला कडक नोटा आवडतात : नवनीत राणा

माझ्या नणंदबाईला कडक नोटा आवडतात : नवनीत राणा

अमरावती : विशेष प्रतिनिधी
देवासमोर वाढलेलं ताट खाण्याचं काम माझ्या नणंद बाईने केलं. दहा वर्षे मतदारसंघाला मागे नेण्याचे काम माझ्या नणंद बाईने केलेले आहे. माझी नणंद बाई ३ टर्म पासून प्रतिनिधीत्व करत आहे. त्यांना फक्त कडक नोटा आवडतात, असं म्हणत माजी खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर जोरदार टीका केली. त्या तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेश वानखडे यांच्या प्रचारार्थ बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, नणंदबाईंना फक्त नोटा आवडतात. बाकी कार्यकर्ते सतरंजी उचलतात. माझ्या नणंद बाईने जाती-जातींमध्ये विभाजन करून मतं घेतले आहेत. मेलेल्या माणसाच्या डोक्यावरचे लोणी खाण्याचे काम नणंद बाई करत आहे. एकही रोजगार उपलब्ध करून दिला नाही, असा आरोपही नवनीत राणा यांनी केला.

पुढे बोलताना राणा म्हणाल्या, १५ वर्षांनंतर महिलांची आठवण झाली. १५ वर्षानंतर डब्बे दिले गोरगरीबांना…राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आराखडा खाऊ शकते, तर तुम्ही विचार करा या मतदारसंघाचे किती वाटोळे नणंद बाईने केले असेल? राहुल गांधीचा खटाखट पैसा आला का? राहुल गांधी संविधान घेऊन फिरतात त्यांना विचारा संविधानामध्ये किती पान आहेत? असा सवालही राणा यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR