17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रमाझा आक्षेप निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर

माझा आक्षेप निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर

नाना पटोलेंचे मोठे विधान

मुंबई : माझा ईव्हिएम मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हिएमवर बोलताना म्हटले आहे.

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सूरूवात केली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी निकालानंतर पत्रकार परिषद देऊन ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत पुरावे सादर केले होते. यानंतर आता मविआचे नेते ईव्हिएमविरोधात आंदोलन पुकारणार आहेत असे असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. माझा ईव्हीएमवर आक्षेप नसल्याचे विधान नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळे पटोलेंच्या या विधानानंतर मविआच्या नेत्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर बोलताना पटोले म्हणाले की, कोण मुख्यमंत्री ठरेल? याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील. त्यामुळे त्यावर आम्ही काय बोलणार नाही. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पारदर्शी म्हटले आहे, यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय २ वर्ष लागत नाही. पण ईव्हीएमचा निर्णय २ तासांत लावतात यावरून ईव्हीएमवरच प्रेम लक्षात येते, असा टोला पटोलेंनी कोर्टाला लगावला.

तसेच ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने गांभिर्याने घेतली असून आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत असे नाना पटोले यांनी सांगितले. जनतेची भीती सरकारच्या मनात नाही. कापूस, धान, सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झाली नाही. लोकांच्या मतापेक्षा मशीन सत्ताधा-यांना प्रिय झाली ही व्यवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही नाना पटोलेंनी सांगितले आहे. मुनगंटीवारला काय वाटत मला माहिती नाही. माझा मशीन वर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शिकतेवर आम्हाला आक्षेप आहे. निवडणूक आयोग पारदर्शी नाही हा माझा आरोप असल्याचे नाना पटोले म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR