नागपूर : औरंगजेबाच्या कबरीविरोधात राज्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता या विषयावरुन नागपूरमध्ये सोमवार दि. १७ मार्च रोजी दोन गटात हिंसक हाणामारी झाली. सायंकाळी नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीवरून हे दोन्ही गट समोरासमोर आले.
काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक सुरू झाली. दगडफेकीत पोलिस जखमी झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दोन्ही गटांनी केलेल्या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांततेचा आवाहन केले आहे. नागुपरात सोमवारी विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले होते. त्यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यानंतर संध्याकाळी शिवाजी चौकात दोन गटात वाद झाला. महल परिसर, चित्रा टॉकीज परिसरात दुस-या गटाची लोक बाहेरुन आली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली.