17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील ८ मतदारसंघाची नावे बदलणार

राज्यातील ८ मतदारसंघाची नावे बदलणार

पुणे : प्रतिनिधी
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असतानाच महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातील तीन लोकसभा आणि पाच विधानसभा मतदारसंघाची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील औरंगाबाद, अहमदनगर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची नावे बदलण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदारसंघांची नावे बदलली जाणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या लोकसभा मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशननंतर ही नावे बदलली जाणार आहेत.

त्याचबरोबर, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचे नामांतर अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे बदलले जाईल. उस्मानाबाद मतदारसंघाचे नामकरण धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे केले जाईल. तर लोकसभेच्या तीन मतदारसंघांची नावेही बदलली जाणार आहेत.

यात उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर आणि अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर करण्यात येणार आहेत. मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार असतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोगाकडून मतदारसंघांची नावे बदलली जातील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR