31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeउद्योगदेशातील सर्वांत सुरक्षित १० बँकांची नावे जाहीर

देशातील सर्वांत सुरक्षित १० बँकांची नावे जाहीर

तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत आरबीआयकडून करण्यात आला खुलासा

नवी दिल्ली : अलिकडच्या काळात बँक घोटाळ्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे, अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. आपण आपल्या आयुष्यभराची जमापुंजी एखाद्या बँकेमध्ये जमा करतो. मात्र त्या बँकेत एखादा मोठा घोटाळा झाला, बँक बुडाली तर आपल्यावर मोठे आर्थिक संकट ओढावते.

बँक बुडाल्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत. मात्र तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे का? की भारतामधील सर्वात सुरक्षित बँक कोणती असू शकते? याबाबत आरबीआयकडून नुकतीच एक दहा बँकांची यादी जारी करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉटन्सच्या आधारावर दहा बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या दहा बँका देशातील सर्वात सुरक्षित बँका मानल्या गेल्या आहेत.

या यादीमध्ये एक नंबरला जी बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, आरबीआयच्या यादीनुसार ही देशातील सर्वात सुरक्षित बँक मानली गेली आहे.
अनेक जण पैशांची गुंतवणूक करताना जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडतात. मात्र याचा परिणाम असा होतो की अशा प्रकरणात त्यांची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

एखादी पतसंस्था किंवा वित्त संस्था गुंतवणूकदारांना जास्त पैशांचे आमिष दाखवते, आशा पतसंस्था राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा जास्त व्याज देतात, मात्र त्या बुडण्याचा धोका देखील बँकांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे अशा पतसंस्थांमध्ये किंवा इतर वित्त संस्थामध्ये जे गुंतवणूकदार एफडी करतात ते राष्ट्रीयकृत बँकातील गुंतवणूकदारांपेक्षा जास्त रिस्क घेत असतात. त्यामुळे आपल्या आयुष्यभराची जमापुंजी सुरक्षित राहावी यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

भारतातील सर्वांत सुरक्षित दहा बँका
१) स्टेट बँक ऑफ इंडिया
२) एचडीएफसी बँक
३) आयसीआयसीआय बँक
४) कोटक महिंद्रा बँक
५) एक्सिस बँक
६) इडून्सलॅन्ड बँक
७) बँक ऑफ बडोदा
८) पंजाब नॅशल बँक
९) यूनियन बँक
१०) कॅनरा बँक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR