23.7 C
Latur
Tuesday, June 25, 2024
Homeक्रीडानामिबियाचा स्टार क्रिकेटर डेव्हिस विसेने जाहीर केली निवृत्ती

नामिबियाचा स्टार क्रिकेटर डेव्हिस विसेने जाहीर केली निवृत्ती

नवी दिल्ली : शनिवारी रात्री इंग्लंड आणि नामिबिया यांच्यात महत्त्वाचा सामना झाला. पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात इंग्लंड संघाने नामिबियावर ४१ धावांनी मोठा विजय मिळवला. या सामन्यानंतर नामिबियाचा स्टार क्रिकेटर डेव्हिड विसेने निवृत्तीची घोषणा केली. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातील नामिबियाचा हा शेवटचा सामना होता. हा संघ केवळ एकच सामना जिंकून स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

आपल्या शेवटच्या सामन्यात डेव्हिड विसेने १२ चेंडूत २७ धावांची स्फोटक खेळी खेळली. २२५ च्या स्ट्राईक रेटने धावा करणा-या विसेने या सामन्यात दोन चौकार आणि दोन षटकार मारले. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने एक विकेटही आपल्या नावावर केली. २०२३ मध्ये डेव्हिड विसने सात वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन केले होते. आयपीएल २०२३ च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने डेव्हिड विसेला आपल्या संघात घेतले होते. २०१६ नंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणारा डेव्हिड विसे हा या स्पर्धेत खेळणारा पहिला नामिबियाचा क्रिकेटपटू आहे.

विसेने दोन देशांकडून खेळला टी-२० विश्वचषक

नामिबियापूर्वी डेव्हिड विसेने दक्षिण आफ्रिकेकडूनही क्रिकेट खेळले होते. त्याने २०१३ ते २०१६ दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये भारतात झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला होता. यानंतर त्याने नामिबियाकडून २०२१ साली टी-२० विश्वचषक खेळला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR