22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमुख्य बातम्यानांदेडला अवकाळीचा तडाखा

नांदेडला अवकाळीचा तडाखा

नांदेड : प्रतिनिधी
दुष्काळी स्थितीत काही ठिकाणी रबी पिके हाता-तोंडाला आलेली असताना अवकाळीचे संकट घोंगावत आहे. त्यातच विदर्भानंतर आता मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यालाही आज अवकाळीचा फटका बसला असून, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गारपीट झाली. तसेच किनवट, हदगाव, भोकर तालुक्यालाही अवकाळीचा फटका बसल्याने रबी पिकांसह फळबागांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतक-यांची प्रचंड हानी झाली. आधीच दुष्काळी संकट आणि त्यात पिके बहरात असतानाच अवकाळीचा तडाखा बसल्याने शेतक-यांना मोठा फटका बसला आहे.

राज्यातील अनेक जिह्यात आज अवकाळी पावसासह गारपीटीने तडाखा दिला. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गारपीट झाली. जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात गारपिटीचा तडाखा बसला. तसेच भोकर, हदगाव आणि किनवट तालुक्यात पावसाच्या हलक्या सारी बरसल्या. तसेच तालुक्यात ढगाळ वातावरण होते. गारपिटीमुळे हिमायतनगरमध्ये शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.

हिमायतनगर तालुक्यात वादळी वा-यासह सायंकाळी गारांचा पाऊस झाला. या भआगात सुपारीपेक्षाही मोठ्या गारा पडल्याने उघड्यावर थांबलेल्या लोकांची तारांबळ उडाली. तालुक्यातील जवळगाव, विरसनी, कामारी, सरसम यासह अनेक गावात गारपीट झाली. या गारपीटीमुळे हरभरा, गहू, करडई, तूर, यासह अन्य शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गळून पडल्याने फळझाडांची हानी झाली आहे. यासोबतच भोकर, किनवट, हदगाव तालुक्यातही अवकाळीचा फटका पिकांना बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतक-यांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR