33.2 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रनांदगाव- छ.संभाजीनगर रस्त्यावर अपघात, ३ ठार

नांदगाव- छ.संभाजीनगर रस्त्यावर अपघात, ३ ठार

नाशिक : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव- छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि कारची जोरदार धडक झाली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.

प्रवाशांचा बसचालकावर आरोप
मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बसचालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR