23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रतब्बल ३६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

तब्बल ३६ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

रायगड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील ऊर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला. त्यानंतर दुस-याच दिवशी नवी मुंबईतून अंमली पदार्थांचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.

नवी मुंबईत कोपरखैरणे पोलिसांनी धडक कारवाई करत २ वेगवेगळ््या ठिकाणांहून सुमारे ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. यामुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. कोपरखैरणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांचा चांगलाच दबदबा या परिसरात निर्माण झाला आहे. औदुंबर पाटील गुन्हेगारांचे अक्षरश: कर्दनकाळ ठरत आहेत.

वाशी परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलिसांनी ३ दिवसांपूर्वी कोपरखैरणे सेक्टर १९ मधील रहिवासी संकुलमधून ३१ लाख ६० हजारांचे एमडी आणि ब्राऊन शुगर जप्त करून यात २ महिला व एका पुरुषाला अटक केली होती. त्यानंतर कारवाईचा धडाका वेगात सुरू झाला.आतापर्यंत पोलिसांनी ब्राऊन शुगर, एमडीसह २ महिला आणि २ पुरुषांना अटक केली असून फरार महिलेचाही शोध सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR