29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रनार्वेकरांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती

नार्वेकरांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची स्क्रिप्ट आधीच ठरली होती. मात्र एक संहिता जनतेच्याही मनात असल्याचे सांगून शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि शिंदे सेनेला इशारा दिला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या वतीने बुधवारी रामटेकमधून काढण्यात येणा-या स्त्री संवाद यात्रेसाठी त्या नागपूरला आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात लागला म्हणून आम्ही विरोधात बोलत नाही. तो विरोधात कसा लावला गेला, हे सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत.
चांदा ते बांदा अशी यात्रा काढण्यात येत आहे. देशाचे मध्यवर्ती ठिकाण नागपूर आहे. त्यामुळे आम्ही यात्रेसाठी नागपूरची निवड केली आहे. येथून आम्ही मुंबईपर्यंत पोहोचू. सगळ्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये जाणार आहोत. महिलांचा जोश बघून तुम्हाला यात्रेची तयारी दिसलीच असेल, असेही पेडणेकर म्हणाल्या.

लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकत्रित लढणार आहेत. जागावाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत. त्यांचा फॉर्म्युला ठरेल तेव्हा तो समोर येणारच आहे. जागावाटपापेक्षा जे ज्या जागेवर आहेत त्यांना आम्हाला चालना द्यायची आहे, असेही पेडणेकर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR