21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआयएमएचा १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप

आयएमएचा १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप

आरोग्य सेवा कोलमडणार? कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण

नवी दिल्ली : कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

आयएमएने १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. आयएमएने एक पत्रक काढून १७ ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा १७ ऑगस्टला बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. आयएमएने म्हटले आहे की कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील क्रूर घटना आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांसोबत झालेल्या गुंडगिरीबाबत आयएमएने १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते रविवार म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मॉडर्न मेडिसिनच्या डॉक्टरांच्या सेवा २४ तास बंद ठेवण्याची घोषणा केली.

सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. अपघातग्रस्तांवर उपचार केले जातील. नियमित ओपीडीच्या सेवा नाहीत आणि वैकल्पिक शस्त्रक्रिया केल्या जाणार नाहीत. हा संप सर्व क्षेत्रांना लागू आहे, जेथे मॉडर्न मेडिसिन डॉक्टर आपल्या सेवा देत आहेत. डॉक्टरांच्या प्रश्नावर आयएमएला देशाच्या सहानुभूतीची गरज आहे असेही म्हटले आहे.

आतापर्यंत १२ जणांना अटक
९ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दुस-या दिवशी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. सीबीआयने गुरुवारी पाच डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले होते. तसेच, याप्रकरणी आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR