29.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरनाट्यदिंडीने उडवला वाहतुकीचा बोजवारा

नाट्यदिंडीने उडवला वाहतुकीचा बोजवारा

लातूर : प्रतिनिधी
महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १०० वे नाट्यसंमेलनानिमित्त दि. १२ फेब्रुवारी रोजी लातूर शहरातून नाट्यदिंडी काढण्यात आली. सकाळी ९ वाजता निघणारी नाट्यदिंडी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास निघाली. तब्बल अडीच तास उशिराने निघालेल्या नाट्यदिंडीने शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला. कसलेही नियोजन आणि व्यवस्था या नाट्यदिंडीदरम्यान नव्हती. एक कला पथक हनुमान चौकात तर दुसरे कला पथक महात्मा गांधी चौकात अशी परिस्थिती होती. त्या परिणाम वाहतूकीवर झाला. नाट्यदिंडीची हौस पुरविणा-यांनी पुरवून घेतली पण त्याचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरीकांना झाला.

नाट्यदिंडीचा प्रारंभ गंजगोलाई येथून झला. यावेळी आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घूगे, अतिरिक्त्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, सिनेअभिनेते मोहन जोशी, भरत जाधव, संकर्षण क-हाडे, स्पृहा जोशी, विजय गोखले आदींचा सहभाग होता. सकाळी ९ वाजता निघणारी नाट्यदिंडी तब्बल अडीच तास उशिराने म्हणजेच सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास निघाली. नाट्यदिंडी निघणार असल्याची माहिती सर्वांना होती. परंतु, याबाबत कसलेही नियोजन नव्हते. नाट्यदिंडी मार्गावरील वाहतूक कोणत्या मार्गावरुन सोडायची आणि त्या मार्गावरील वाहतुकीचे करायचे काय? याचा कुठलाही विचार किंवा नियोजन झालेले नव्हते. सकाळी ९ वाजता नाट्यदिंडी निघेल आणि शहरातील वाहतूक सुरु होण्याअधी नाट्यदिंडी संपले, असे कदाचीत वाटले असावे की काय? माहित नाही. परंतु, नाट्यदिंडी वाहतुकीचा पुर्णत: बोजवारा उडाला.

गंजगोलाई ते दयानंद महाविद्यालय, असा नाट्यदिंडीचा मार्ग होता. गंजगोलाईतून नाट्यदिंडी निघाली त्यामुळे गंजगोलाई ते महात्मा गांधी चौकापर्यंतची वाहतुक अचानक नांदेड रोड व मध्ययवर्ती बसस्थानकाच्या मागील रस्त्याकडे वळविण्यात आली, परंतु, या मार्गांवर अधिच वाहतुक सुरु असल्याने या दोन्ही मार्गांवर वाहने समोरासमोर आली आणि वाहतूक कोंडी झाली. नाट्यदिंडी महात्मा गांधी चौकातून पुढे निघताच महात्मा गांधी चौक ते लोकमान्य टिळक चौकापर्यंतच्या रस्त्यावरील वाहतूक सावेवाडीचा रोड व विलासराव देशमुख मार्गाकडे वळविण्यात आली. मात्र याही रस्त्यांवर दुतर्फा वाहतूक सुरु झाल्याने या दोन्ही रस्त्यांवर वाहने समोरासमोर येऊन वाहतूक ठप्प झाली. पुढे लोकमान्य टिळक चौक ते दयानंद महाविद्यालयापर्यंतची वाहूक पर्यायी रस्त् यावर वळवली. त्या रस्त्यांवरही वातूक कोंडी झाली. या नाट्यदिंडीच्या ढिसाळ नियोजनामुळे सामान्य नागरीकांना मात्र तळपत्या उन्हात वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR