27 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रबीडच्या पोलिस अधीक्षकपदी नवनीत कॉवत

बीडच्या पोलिस अधीक्षकपदी नवनीत कॉवत

बीड : बीडमधील सरपंच हत्यासह इतर मुद्दे जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी आमदारांनी अधिवेशनात उपस्थित केले. या सर्वांच्या बोलण्यातून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे दिसले. त्यामुळेच शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अविनाश बारगळ यांची बदली करत असल्याचे सभागृहात जाहीर केले. या पदावर आता छत्रपती संभाजीनगर येथे पोलिस उपआयुक्त म्हणून कार्यरत आयपीएस अधिकारी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बारगळ यांच्या नियुक्तीचे आदेश नंतर निघणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण राज्यभर गाजले. यासह आठवडाभरात परळीतील उद्योजक अपहरण, बीडमधील गोळीबार, मस्साजोगमधीलच खंडणी प्रकरण आदी घटनांमुळे बीड आहे की बिहार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

नंदकुमार ठाकूर यांची बदली झाल्यानंतर ७ ऑगस्ट रोजी अविनाश बारगळ यांची पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. विधानसभा निवडणूक अनुषंगाने अनेक प्रतिबंधात्मक कारवायाही केल्या. परंतु निवडणुकीनंतर जिल्ह्यात सामाजिक सलोखा बिघडत गेला. पोलिसांनी राजकीय दबावापोटी काही खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जिल्ह्यातील आमदारांनी केला. त्यानंतर लगेच केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला.

४ महिन्यांतच बदली
अविनाश बारगळ यांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी पोलिस अधीक्षक म्हणून पदभार हाती घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी अनेक कारवाया करून गुन्हेगारांमध्ये वचक तर सामान्यांमध्ये सन्मानाची भावना तयार केली होती. परंतु अनेक ठिकाणी खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप झाला. त्यामुळेच त्यांची फडणवीस यांनी बदली करण्याचा निर्णय घेतला. बारगळ हे जिल्ह्यात ४ महिने १३ दिवस राहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR