22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रनवनीत राणांनी संविधान वाचले नाही

नवनीत राणांनी संविधान वाचले नाही

इम्तियाज जलील यांची टीका

छ. संभाजीनगर :
नवनीत राणा यांच्याबाबतीत मला एक म्हण आठवते. इन्सान कितना भी अच्छा क्यूँ न हो कुत्तेसे अच्छा भौंक नही सकता. मी हे नवनीत राणा यांना बोलत नाही. पण ज्या प्रकारे या महिला भाषा वापरत आहेत, मला सांगण्यात आलं आहे की त्या एससी कॅटेगरीतून निवडून आल्यात. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान वाचलं की नाही हे मला माहीत नाही. पण लोकसभेत त्या फक्त भाजपाकडून तिकिट हवं आहे म्हणून काही गोष्टी करत असतात. संविधान त्या विसरल्या आहेत.

दरम्यान, असदुद्दीन ओवेसींवर नवनीत राणा कौर यांनी टीका केली होती. एवढंच नाही तर इस देशमें रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा असेही आव्हान त्यांनी दिले होते. इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले, त्यांच्यात धमक असेल तर एकदा अमरावतीत लढून दाखवावं आणि निवडून येऊन दाखवावं. जलील यावेळी संभाजीनगरातून कसे निवडून येतात तेच मी बघते असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या सगळ्यावर आता इम्तियाज जलील यांनी उत्तर दिले आहे.

असदुद्दीन ओवेसींनी लोकसभेत सांगितले होते की आम्ही पुरुषोत्तम रामाचा आदर करतो पण आम्ही नथुराम गोडसेचा आदर करत नाही. हे नथुरामच्या प्रवृत्तीचे लोक आहेत. या महिला खासदारांबाबत मी सांगेन की त्या सवंग प्रसिद्धी मिळवतात. हनुमान चालीसा यांना स्वत:च्या घरात नाही तर उद्धव ठाकरेंच्या घरासमोर वाचायची होती. तेव्हा या महिला उद्धव ठाकरेंचं नाव घेत होत्या. आता ओवेसी यांचं नाव घेऊन टीका करत आहेत. असे उत्तर जलील यांनी दिले आहे. अशा महिलांना आम्ही महत्त्व देत नाही असेही जलील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR