22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयनवाझ शरीफ होणार चौथ्यांदा पंतप्रधान?

नवाझ शरीफ होणार चौथ्यांदा पंतप्रधान?

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये अद्याप गोंधळाची स्थिती आहे. मात्र, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ)चे प्रमुख नवाझ शरीफ पंतप्रधान होण्याची दाट शक्यता आहे. शरीफ यांच्या पक्षाने पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान यांच्यासोबत सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरु केल्या आहेत.

नवाझ शरीफ हे पंतप्रधानपद आपल्याकडे ठेवतील तर राष्ट्रपती आणि संसद अध्यक्ष हे पद सहयोगी पक्षांसाठी सोडले जातील यावर तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाल्याची माहिती आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान आणि निकालादरम्यान अशांततेची स्थिती होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. मात्र, मतमोजणी दरम्यान प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला.

पाकिस्तानचे लष्कर सध्या तीन वेळचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या समर्थनामध्ये आहे. माजी क्रिकेटपटू आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान-ए-इंसाफ ला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या समर्थकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. त्यामुळे पाकिस्तान जनतेला बदल हवाय असे यातून सूचित होत असल्याचा पीटीआय पक्षाचा दावा आहे.

अंतिम निकालामध्ये इम्रान यांच्या पीटीआय पक्षाचे समर्थन असलेल्या अपक्ष उमेदवारांना ९७ जागा जिंकता आल्या आहेत. तर, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७६ जागांवर विजय मिळवला. तसेच, पाकिस्तान पीपल्स पार्टीने ५४ जागा जिंकल्या आहेत. १७ जागा मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तानला मिळाल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR