सोलापूर — संसदेमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचे हुकूमशाही पद्धतीने निलंबन करणे योग्य नाही. सध्या देशात हुकूमशाही सुरू आहे. पक्ष सोडून गेलेले लोक शरद पवार यांच्यावर टीका करतात. शिंदे सरकार जेंव्हा झाले तेव्हा याच लोकांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी घोषणा दिली. आता हेच लोक त्यांच्या सोबत बसले आहेत, असे अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचे नाव न घेता राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी टीका केली. राष्ट्रवादीच्या वतीने बुधवारी शिवस्मारक सभागृहात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राभिमान बैठक पार पडली. या बैठकीनंतर भागवत टॉकीज नजीकच्या रस्त्यावर सर्व नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, तौफिक शेख, प्रथमेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक अध्यक्ष अक्षय वाकसे, युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख, चंद्रकांत पवार, बिज्जू प्रधाने, युवराज सरवदे, राजू कुरेशी, तुषार पवार, वैभव विभुते, गोविंद चिंता, महिला अध्यक्षा सुनीता रोटे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, सिद्ध निशाणदार, संदीप महाले, संजय गायकवाड, रजनीकांत ठेंगील, झाकीर शेख, महेश जेऊरे, धीरज मुधोळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अक्षय वाकसे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या वतीने संपूर्ण शहरात बारा ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत, यासाठी युवकांची मोठी फळी तयार करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा युवक आता रस्त्यावर उतरला असून महेश कोठे यांना शहर उत्तरमधून आमदार केल्याशिवाय युवक शांत राहणार नाही. असे सांगितले.