25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयएनडीएला ३३० जागा मिळण्याचा अंदाज

एनडीएला ३३० जागा मिळण्याचा अंदाज

ब्रोकरेज हाऊसचे आकडे समोर भाजपला ३०० गाठणे कठीण

नवी दिल्ली : देशातील विविध ब्रोकरेज हाऊसकडून भाजपला किती जागा मिळणार? त्यासंदर्भातील माहिती देण्यात आली असून ब्रोकरेज हाऊस फिलिपकॅपिटल, आयआयएफएल, जेएमएफएल आणि बर्नस्­टीन यांनी आपला अंदाज वर्तवला आहे. सत्ताधारी भाजप आणि एनडीएला ब्रोकरेज हाऊसने किती जागा दिल्या आहेत. फिलिपकॅपिटलच्या अंदाजानुसार, बेस केस म्हणजेच सामान्­य परिस्­थ­ति­ीत भाजपला २९०-३०० जागा मिळतील तर एनडीएला ३३०-३४० जागा मिळणार आहेत. निकाल या अंदाजानुसार आल्यास इक्विटी, कॉर्पोरेट आय आणि अर्थव्यवस्थेत सकारात्मक दृष्टिकोण दिसणार आहे. या ब्रोकरेज हाऊसने बुल केस म्हणजेच आक्रमक परिस्थितीत भाजपला ३२५ जागा मिळणार असल्याचे जाहीर केले. तसेच एनडीएला ३६० जागांचा अंदाज व्यक्त केला आहे. बियर केस म्हणजे खराब परिस्थितीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळणार नाही. परंतु एनडीएचे सरकार येईल.

लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्याकडे आली आहे. आता शेवटचा सातवा टप्पा १ जून रोजी शन­विारी होणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून जाहीर होणार आहे. यामुळे या दिवशी कोणाला किती जागा मिळणार? हे स्पष्ट होणार आहे. परंतु राजकीय विश्लेषक निवडणुकीसंदर्भात भविष्यवाणी करत आहेत. आता भाजप तिस-यांदा सत्तेत येणार की २००४ प्रमाणे ‘इंडिया शायनिंग’ सारखी परिस्थिती होईल, हे ४ जून रोजी समजणार आहे.

इतर ब्रोकरेज हाऊसचा अंदाज काय?
ब्रोकरेज हाऊस आयआयएफएलने बेस केसमध्ये भाजपला ३२० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जेएमएफएलनुसार भाजप २९९ जागांवर विजयी होईल. बियर केसमध्येही भाजपला २९० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बुल केसमध्ये भाजपला ३१० जागा मिळतील.

बहुतांशांचा कल एनडीएकडे
ब्रोकरेज हाऊस बर्नस्टीनचा भाजप आणि एनडीएबाबतचा अंदाज खूपच जास्त आहे. बेस केसमध्ये, त्यांनी एनडीएला ३३०-३५० जागा जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बुल केसमध्ये एकट्या भाजपला २९० जागा मिळू शकतात. त्याचबरोबर एनडीएला ३४० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात. एकंदरीत बहुतांश ब्रोकरेज हाऊसचा अंदाज भाजपच्या बाजूने आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिस-यांदा केंद्रात सरकार स्थापन करेल, असे त्यांना वाटते. २००४ मधील ‘इंडिया शायनिंग’च्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR