27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडानीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकचा स्वत:चाच विक्रम मोडला

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकचा स्वत:चाच विक्रम मोडला

नीरज चोप्राने कारकिर्दीतील सर्वोत्तम भालाफेक केली

नवी दिल्ली : भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी सुरूच आहे. नीरज प्रत्येक इव्हेंटमध्ये त्याच्या थ्रोची श्रेणी सतत वाढवत आहे. हा ट्रेंड लॉसने डायमंड लीगमध्ये चालू राहिला. नीरजने २२ ऑगस्टच्या रात्री लॉसने डायमंड लीगमध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला आणि आपल्या कारकिदीर्तील सर्वोत्तम थ्रो फेकले. या थ्रोच्या जोरावर तो दुस-या क्रमांकावर राहिला.

नीरज चोप्रा जेव्हा लॉसने डायमंड लीगमध्ये पोहोचला तेव्हा दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीबद्दल चाहत्यांमध्ये शंका होती. मात्र सहाव्या प्रयत्नात त्याने कारकिदीर्तील सर्वोत्तम थ्रो फेकून दुसरे स्थान मिळवले आणि झुरिच येथे होणा-या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत धडक मारली. चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८२.१० मीटर फेक केली. दुस-या प्रयत्नात ८३.२१ असा थ्रो फेकला. तिस-या प्रयत्नात त्याने ८३.१३ असा थ्रो केला, चौथ्या प्रयत्नात त्याचा थ्रो ८२.३४ होता. ५ व्या प्रयत्नात नीरजने ८५.५८ मीटर फेक केली आणि सहाव्या प्रयत्नात नीरजचा कारकिदीर्तील सर्वोत्तम ८९.४९ थ्रो केला.

पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला
दरम्यान, नीरज चोप्राने २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये ८९.४५ फेक करून रौप्यपदक जिंकले होते. हा त्याचा सर्वोत्कृष्ट थ्रो होता पण लॉसनेमध्ये त्याने आपला विक्रम आणखी सुधारला आहे. कदाचित, तो डायमंड लीगच्या अंतिम फेरीत आणखी चांगली कामगिरी करेल आणि ९० मीटरचे लक्ष्य गाठेल. नीरजला आतापर्यंत ९० मीटर भालाफेक करता आलेली नाही. २०२२ मध्ये नीरजने डायमंड लीगमध्ये सुवर्ण तर २०२३ मध्ये त्याच स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR