25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeछत्रपती संभाजीनगर‘नीट’ : तपासाचा फोकस आता लातूर ऐवजी बीडवर केंद्रित

‘नीट’ : तपासाचा फोकस आता लातूर ऐवजी बीडवर केंद्रित

बीड : प्रतिनिधी
नीट पेपरफुटीप्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत असल्याचे म्हटले जात होते. पण पोलिसांच्या तपासाचे केंद्र आता लातूर ऐवजी बीडमध्ये स्थिरावले आहे. आरोपींकडे सापडलेल्या १४ प्रवेशपत्रांपैकी ८ प्रवेशपत्र बिहारमधील आहेत. त्यात १ लातूरचा तर ७ बीडचे विद्यार्थी आहेत. सापडलेल्या प्रवेशपत्रांपैकी सर्वाधिक संख्या ही बीडच्या विद्यार्थ्यांची असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांचे लक्ष आता बीडकडे वळाले आहे.

नीट पेपरफुटीचा तपास आता सीबीआयकडे वर्ग झालेला आहे. सीबीआयची टीम लातूरमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर लातूर पोलिसांनी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. संजय जाधव आणि जलीलखॉँ पठाण यांना पोलिसांनी अटक केली. इतर दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

बीडचे नेमके कनेक्शन काय?
आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एकूण १४ पैकी ८ प्रवेशपत्र हे परराज्यातील आहेत. त्यापैकी ७ प्रवेशपत्र हे बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आहेत, तर १ प्रवेशपत्र हे लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे आहेत. याच कारणामुळे लातूर पोलिसांच्या तपासाचा फोकस आता बीड जिल्ह्याकडे वळला आहे. पोलिसांनी तेथील पालकांची चौकशी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR