मुंबई : बॉलिवूडमधील टॉपच्या गायिकांमध्ये नेहा कक्करचे नाव आहे. नेहाने तरुणाईला आपल्या गाण्याने वेड लावले आहे. नेहा सध्या तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नेहा आणि रोहनप्रीत सिंग घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्या फक्त अफवा असल्याचे नेहाने एका मुलाखतीत सांगितले आहे.
दरम्यान, नेहा आणि रोहनप्रीतचे २०२१ मध्ये लग्न झाले होते. दोघांचे लव्ह मॅरेज आहे. लग्नानंतर नेहाने कुटुंबावर लक्ष क्रेंदित केले होते. मध्यंतरी नेहा-रोहनच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. याच चर्चांवर अखेर एका मुलाखतीत नेहा म्हणाली, ‘मी लग्न केल्यापासून फक्त दोनच अफवा आहेत. पहिली अफवा की मी गरोदर आहे आणि दुसरी अफवा ती म्हणजे माझा घटस्फोट होत आहे. अशा बातम्या ऐकून खूप वाईट वाटते. लोक गॉसिपसाठी काहीही म्हणतात, पण मी या सर्व गोष्टींकडे लक्ष न देण्याचा प्रयत्न करते. कारण मला सत्य काय आहे हे माहीत आहे .
नेहाने टीव्हीवरून ब्रेक घेण्याचे कारण सांगितले. ती म्हणाली, ‘हा ब्रेक माझ्यासाठी आवश्यक होता. मी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप थकले होते. मी लहान वयातच या उद्योगात काम करायला सुरुवात केली. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे करणे आवश्यक होते. पण आता मी पूर्ण ऊर्जेने परतले आहे. नेहा कक्कर ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या पडद्यापासूनही दूर आहे. ती २०२२ मध्ये ‘इंडियन आयडल’ शोमध्ये जज म्हणून दिसली होती.