22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeराष्ट्रीयना मी निष्पक्ष, ना प्रशांत किशोर

ना मी निष्पक्ष, ना प्रशांत किशोर

योगेंद्र यादवांनी स्वत:च केली भविष्यवाणींची पोलखोल

नवी दिल्ली : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यादिवशी देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल. पण, त्याआधी राजकीय तज्ज्ञांकडून निकालाबाबत भविष्यवाणी केली जात आहे. राजकीय तज्ज्ञांमध्ये प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव या दोघांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असला तरी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये फरक आहे. योगेंद्र यादव यांनी भाजपच्या २० ते ३० जागा कमी होतील असा अंदाज वर्तवला आहे. ते भाजपला २७२ किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळतील असं म्हणाले आहेत. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागा २० ने वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे. नेमकेकशाच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला? तसेच त्यांच्या आणि प्रशांत किशोर यांच्या भविष्यवाणीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न योगेंद्र यादव यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर यादव यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की ना माझ्याकडे एक्झिट पोल आहे ना त्यांच्याकडे. ते निष्पक्ष नाहीत आणि मी पण निष्पक्ष नाही. त्यांच्या आणि माझ्या काही राजकीय समजेच्या मर्यादा आहेत. पण, आम्ही प्रामाणिकपणे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो.

माझे आणि त्यांचे मूल्यांकन वेगवेगळे आहे. मला त्यांच्या दोन गोष्टी अमान्य आहेत. मी म्हणतो की भाजपच्या एका भागात जागा वाढतील तर दुस-या भागात कमी होतील. प्रशांत यांना वाटते की भाजपला १५ ते २० जागा जास्त मिळतील. समजा ५० पेकी ४० जागांवर नुकसान झाले आणि दुसरीकडे २० जागा वाढल्या, अशा स्थितीतही भाजपच्या २० जागा कमी होताना दिसत आहेत. मग, प्रशांत भाजपच्या २० जागा वाढतील हे कशाच्या आधारे म्हणत आहेत, असा सवाल यादव यांनी केला.

महाराष्ट्रात भाजपला कमी जागा?
भाजपला २० जागा जास्त मिळतील असे मला बिलकूल वाटत नाही, कारण फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये पाहिले तरी भाजपला इथे जास्त जागा मिळणार नाहीत असे चित्र आहे. मला असेही वाटते की कर्नाटक, महाराष्ट्रपासून बिहारपर्यंत भाजपच्या विरोधात एक सौम्य लाट सुरु आहे असे यादव म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR