काठमांडू : नेपाळ सरकारने सोमवारी चिनी सोशल मीडिया अॅप टिकटॉकवर बंदी घालण्याची घोषणा केली.
नेपाळच्या माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान मंत्री रेखा शर्मा यांनी सांगितले की, टिकटॉक विरोधात बऱ्याच दिवसांपासून तक्रारी येत आहेत. रेखा शर्मा म्हणाल्या, हा एक असा विषय आहे ज्यावर मंत्रिमंडळात अनेकदा चर्चा झाली आहे. याविषयी अनेक तक्रारी आल्या होत्या.
या प्रकरणी टिकटॉकच्या प्रतिनिधीलाही बोलावून याकडे लक्ष वेधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या बंदीचे कारण हे अॅप मनोरंजनापेक्षा समस्यांशी अधिक निगडीत असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मनोरंजनाची इतरही साधने आहेत, जसे की फेसबुक, ट्विटर इत्यादी. आम्ही त्यांच्यासाठी काहीही केलेले नाही.