नवी दिल्ली : ‘मिस युनिव्हर्स २०२३’ ही स्पर्धा वेगवेगळ्या कारणांनी खास ठरली आहे. ‘मिस युनिव्हर्स’ ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक पातळीवरील सौंदर्य स्पर्धा आहे. जगातील सर्वांत लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा म्हणून ही मानली जाते. यंदा तृतीयपंथीयांपासून ते प्लस साईजपर्यंत अनेक स्पर्धक या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत सहभागी झाले होते. यंदा सहभागी झालेल्या स्पर्धकांनी इतिहास रचला आहे. सध्या नेपाळची प्लस साईज मॉडेल जेन दीपिका गैरेट चर्चेत आहे.
‘मिस युनिव्हर्स २०२३’ मधील जेन दीपिका गैरेट या स्पर्धकाने झिरो फिगर, फिट अॅण्ड फाईन असा टॅग मोडून काढला आहे. मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बोलबाला आहे. २२ वर्षीय गैरेटच्या रॅम्प वॉकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थित असलेला प्रत्येक जण जेन दीपिका गैरेटचा मोठा चाहता झाला आहे. जेन दीपिका गैरेटने आपल्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘मिस युनिव्हर्स २०२३’ या स्पर्धेत सहभागी झालेल्या मिस नेपाळ जेन दीपिका गैरेटने बॉडी पॉझिटिव्हिटीचा संदेश दिला आहे. सौंदर्यवतींनी आपल्या साईजकडे लक्ष न देता फॅशन आणि सौंदर्य तसेच लूककडे लक्ष द्यायला हवे, असे जेन दीपिका गैरेटचे मत आहे. ‘मिस नेपाळ’ ठरलेल्या जेन दीपिका गैरेटने २० स्पर्धकांना हरवले आहे. जेन दीपिका गैरेट मॉडेल असण्यासोबत नर्स आणि बिझनेस डेव्हलपरदेखील आहे. महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी तिने प्रयत्न केले आहेत. हार्मोन्सच्या समस्यांमुळे जेनचे वजन वाढले. जेन दीपिका गैरेटचा जन्म अमेरिकेत झाला आहे. सध्या ती नेपाळमधील काठमांडू परिसरात राहते. सध्या जगभरात तिचे नाव चर्चेत आहे.
जेन दीपिका गैरेट निघाली होती आत्महत्या करायला
जेन दीपिका गैरेट आज जगभरात लोकप्रिय असली तरी ‘मिस युनिव्हर्स २०२३’ या स्पर्धेआधी ती वाढलेल्या वजनामुळे चर्चेत आली होती. वाढलेल्या वजनामुळे ती आत्महत्या करायला निघाली होती. एक वर्षाआधी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. पण आता याच वाढलेल्या वजनाची दखल जगाला घ्यायला लावली.