18.8 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeमहाराष्ट्रपाच मामांच्या मारहाणीत भाच्याचा गेला जीव

पाच मामांच्या मारहाणीत भाच्याचा गेला जीव

- जमिनीचा वाद विकोपाला गेला _ बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

बीड : जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरामध्ये भर दिवसा मोंढा परिसरामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. काठीने मारहाण करत पाच जणांनी या तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यामध्ये खून करणा-या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारे पाचही आरोपी मयत तरुणाचे मामा आहेत.

राजेंद्र श्रीराम कळसे (वय ३७ वर्षे, रा. महसूल कॉलनी, अंबाजोगाई) असे मयताचे नाव आहे. तर, राम माणिकराव लाड, लक्ष्मण माणिकराव लाड, भारत माणिकराव लाड, बजरंग माणिकराव लाड, शत्रुघ्न माणिकराव लाड असे आरोपींची नावे आहेत.

राजेंद्र कळसे हा अंबाजोगाई शहरातील पाटबंधारे विभागाच्या मांजरा कॉलनीमध्ये राहत होता. राजेंद्र कळसे आणि त्यांचे पाच मामा यांच्यामध्ये जागेवरून ब-याच दिवसांपासून वाद सुरू होता. याच जागेवरून त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. याचाच राग मनात धरून पाचही मामांनी राजेंद्र कळसे हा मोंढा परिसरात उभा असताना, त्याला काठ्यांनी जबर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेला राजेंद्र जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR