मुंबई : प्रतिनिधी
माथेरानच्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून यंदाही पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेनची सेवा ८ जून २०२४ पासून बंद करण्यात येणार आहे.
पावसाळ्यात फक्त माथेरान ते अमन लॉजपर्यंत शटल सेवा सुरू असणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मिनी ट्रेनची नेरळपासून सुरू होणारी सेवा डोंगर-द-यांतून अमन लॉजपर्यंत पोहोचताना वळणदार मार्ग असून सुरक्षिततेच्या हेतूने पावसाळ्यात ही मिनी ट्रेन ८ जून २०२४ ते १५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत बंद ठेवण्यात येत असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.
परंतु, पावसाळ्यादरम्यान नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा जरी बंद करण्यात येणार असली तरी, माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणारी शटल सेवा मात्र नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा पूर्णत: हिरमोड न होता माथेरान ते अमन लॉजपर्यंत असणा-या सेवेचा प्रवाशांना आनंद लुटता येईल.