22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रवंचितसह डाव्यांसाठी नव्याने चर्चा करणार

वंचितसह डाव्यांसाठी नव्याने चर्चा करणार

मुंबई : महायुतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ‘एंट्री’ झाल्याने महाविकास आघाडीनेही वंचित बहुजन आघाडी आणि डावे पक्ष सोबत यावेत, यासाठी नव्याने चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. मनसेमुळे महायुतीला मुंबईतील जागांवर फायदा होणार असल्याने वंचित बहुजन आघाडी सोबत असावी, अशी आग्रही भूमिका आजच्या आघाडीच्या बैठकीत मांडण्यात आली.

तसेच अद्याप दहा जागांवर टोकाचे मतभेद असल्याने आघाडीचे जागा वाटप अजून तीन ते चार दिवसांवर लांबण्याची शक्यता असून काही जागांची अदलाबदल देखील केली जाणार असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी काल सकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार संजय राऊत उपस्थित होते. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. जागा वाटपाबरोबर प्रचार सभा व इतर मुद्यांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यातील सर्व ४८ जागा महाविकास आघाडी लढवत आहे. आघाडीतील सर्व मित्रांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. वंचित बहुजन आघाडीशी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे चर्चा करणार असून ते आज देखील बोलले असल्याचे समजते. आघाडीची जागा वाटपावर चर्चा झाली असून वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पक्ष, माकप या मित्रपक्षांशी बोलणी झालेली आहे. वंचितसोबतही आजही चर्चा झाली, असे नाना पटोले यांनी येथे सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR