22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरमहापालिकेत नवीन आठ डिसल्टिंग मशिन, ड्रेनेज विभागाचे आधुनिकीकरण

महापालिकेत नवीन आठ डिसल्टिंग मशिन, ड्रेनेज विभागाचे आधुनिकीकरण

सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ड्रेनेज विभाग आता त्या दोन्ही विभागांचे अत्याधुनिकीकरण होत आहे. त्याचाच भाग म्हणून महापालिकेने नवीन आठ डिसल्टिंग मशिन खरेदी केल्या आहेत. या मशिनमुळे आता कर्मचाऱ्यांचे मेनहोलमध्ये उतरून धोकादायक काम टळणार आहे.

महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली यांत्रिक विभागाच्या वतीने ड्रेनेज विभागाचे सक्षमीकरण करण्यात येत आहे. याअंतर्गतच महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील ड्रेनेज विभागाच्या ताफ्यात आता नवीन आठ मशिन दाखल झाल्या आहेत. यापूर्वी दोन अशा मशिन महापालिकेने खरेदी केल्या होत्या. त्या जुन्या झाल्या आहेत. त्यात आता या नवीन आठ मशिनची भर पडली आहे. यामुळे आता प्रत्येक झोन कार्यालयाला एक मशिन उपलब्ध होणार आहे.

ड्रेनेजलाईन मेनहोलमध्ये उतरून मलबा काढणे आता सोपे झाले आहे. या एका मशिनची किंमत ११ लाख ८० हजार रुपये आहे. १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. शासनाच्या जीईएम पोर्टलवरुन या मशिन घेतल्या आहेत, अशी माहिती वाहन विभागाचे अभियंता गिरीश पुकाळे यांनी दिली. मेनहोलमधील गाळ हाताच्या पंजाप्रमाणे ही मशिन उपसा करते. यामुळे कर्मचाऱ्याला चेंबरमध्ये उतरून धोकादायक परिस्थितीत गाळ काढण्याची गरज भासणार नाही.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR