नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७५ व्या वर्धापनदिनाच्या स्मरणार्थ नवीन ध्वज आणि चिन्हाचे अनावरण केले.
नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी यांनी न्याय आणि लोकशाहीचे प्रतीक असलेला हा नवा ध्वज आणि बोधचिन्हाची कल्पना सादर केली आहे. या नवीन ध्वजात अशोक चक्र, सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि संविधानाचे पुस्तक दाखविण्यात आले आहे.
जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वज आणि चिन्हाचे अनावरण करण्यात आले. भारताचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड हे यावेळी उपस्थित होते.