28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रगद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा : संजय राऊत

गद्दारांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची नवी परंपरा : संजय राऊत

मुंबई : बेइमान्यांना हिंदुहृदयसम्राट म्हणण्याची परंपरा महाराष्ट्राच्या बाहेर सुरू झालेली दिसते आहे. कारण महाराष्ट्रात असे काही केले तर लोक जोड्याने मारतील असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या पोस्टरवरून संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. राजस्थानात एकनाथ शिंदे यांच्या प्रचाराचे पोस्टर होते. त्यावर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट असा करण्यात आला होता. यावरूनच संजय राऊत आक्रमक झाले आहेत.

हिंदुहृदयसम्राट आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वत:च सांगितले पाहिजे. कारण त्यांचा पक्ष म्हणजे जो काही गट त्यांनी स्थापन केला आहे तो गट आणि अजित पवार गट हे भविष्यात भाजपात विलीन होणार आहेत.

कमळ चिन्हावर निवडणुका लढवतील. त्यांनी स्वत:ला कितीही पदव्या बाहेर लावल्या तरीही महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची त्यांची हिंमत नाही. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथे अशा पदव्या लावत आहेत. उद्या अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रचाराला गेले तर तिथेही असेच करतील, असा टोला राऊत यांनी लगावला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR