राजकोट : न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेतील दुस-या सामन्यात भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. बुधवारी किवीज संघाने ४७.३ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात २८५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.
डॅरिल मिशेलने ११७ चेंडूत १३१ धावांची शतकी खेळी केली. त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याशिवाय विल यंगने ८७ धावा केल्या. राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत ७ विकेट्सच्या मोबदल्यात २८४ धावा केल्या. भारताकडून केएल राहुलने ९२ चेंडूत नाबाद ११२ धावा काढल्या आणि त्याचे ८ वे एकदिवसीय शतक साकारले. कर्णधार शुभमन गिलने ५६, रोहित शर्माने २४ आणि विराट कोहलीने २३ धावा केल्या. रवींद्र जडेजाने २७ धावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.
न्यूझीलंडकडून ख्रिश्चन क्लार्कने तीन विकेट घेतल्या, तर पदार्पण करणा-या जेडेन लेनोक्स, जॅक फॉल्क्स, काइल जेमीसन आणि कर्णधार मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

