29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडाभारतात टीव्हीवर दाखवले जाणार न्यूझिलंडचे सामने

भारतात टीव्हीवर दाखवले जाणार न्यूझिलंडचे सामने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात ११ वर्षांनंतर टीव्हीवर न्यूझिलंड क्रिकेट पाहता येणार आहे. २०१३ मध्ये न्यूझिलंड-वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान निओ स्पोर्टस्कडे न्यूझिलंड क्रिकेटचे टीव्ही प्रसारण हक्क होते. यानंतर आता सोनी स्पोर्टस् नेटवर्कने सात वर्षांसाठी न्यूझिलंड क्रिकेटचे टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्क विकत घेतले आहेत.

यामध्ये पुरुषांचे (ब्लॅककॅप्स) आणि महिलांचे (व्हाईट फर्न्स) सर्व फॉरमॅटमधील सामने असतील. भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. याआधी २०२० मध्ये,अ‍ॅमेझॉन प्राईम व्हीडीओने २०२४-२५ सीझनपर्यंत डिजिटल प्रसारण अधिकार घेतले होते, परंतु टीव्ही प्रसारण अधिकार फार काळ कोणाकडेही नव्हते. जगातील सर्वांत यशस्वी संघांपैकी एक असूनही, न्यूझिलंड क्रिकेट संघाचा भारतात घरच्या सामन्यांसाठी टीव्ही ब्रॉडकास्टर मिळण्याचा प्रवास खूप आव्हानात्मक आहे.

याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय वेळेनुसार पहाटे तीन वाजता न्यूझिलंडमधील सामना सुरू होणार आहे. १ मे २०२४ ते ३० एप्रिल २०३१ पर्यंतच्या या ऐतिहासिक करारामध्ये २०२६-२७ आणि २०३०-३१ च्या उन्हाळ्यात भारताचा न्यूझिलंड दौरा तसेच इतर सर्व द्विपक्षीय कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० सामन्यांचा समावेश असेल. या काळात न्यूझिलंडचे सर्व सामने सोनी स्पोर्टस् नेटवर्कवर टीव्हीवर प्रसारित केले जातील आणि सोनी लिव्हवर ऑनलाईन थेट प्रवाहित होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR