26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडान्यूझीलंडची सोफी कर्णधारपद सोडणार

न्यूझीलंडची सोफी कर्णधारपद सोडणार

महिला टी-२० विश्वचषकानंतर घेणार निर्णय

नवी दिल्ली : बांगला देशमध्ये महिला टी-२० विश्वचषक २०२४ खेळला जाणार होता. मात्र, तेथील राजकीय अस्थिरता आणि अशांततेमुळे विश्वचषक सामने आता यूएईमध्ये होणार आहेत. विश्वचषक सामन्यांची सुरूवात ३ ऑक्टोबरपासून होणार असल्यामुळे सध्या यूएईमध्ये या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईनने या फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सोफीने टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असला तरी ती वनडे फॉरमॅटमध्ये न्यूझीलंड संघाची कमान सांभाळणार आहे. सोफीने वर्क लोड मॅनेजमेंट अंतर्गत टी-२० फॉरमॅटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी भारतात होणा-या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ती न्यूझीलंडचे कर्णधार असेल. कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर सोफी म्हणाली, मला दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची संधी मिळाल्याचा अभिमान वाटतो. मी त्याचा पुरेपूर आनंद घेतला. टी-२० मधून कर्णधारपद सोडल्यानंतर माज्या कामाचा भार थोडा कमी होईल. दरम्यान, मी एकदिवसीय संघाचे नेतृत्त्व करेल. मात्र, मी एकदिवसीय संघाची कायमची कर्णधार नाही. मला एक एक करून कर्णधारपद सोडायचे आहे. असे कर्णधार सोफीने म्हटले. तिच्या या निर्णयाला संघ व्यवस्थापनाचाही पाठिंबा आहे.

सोफी डिव्हाईनची कामगिरी
दरम्यान, न्यूझीलंड महिला क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून सोफी डिव्हाईनचे नाव घेतले जाते. तिने ८ शतके आणि १५ अर्धशतकांच्या मदतीने ३८६० धावा करण्यासोबतच १४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०१ विकेट्स घेतल्या आहेत. तर १३५ टी-२० सामन्यांमध्ये तिने ३२६८ धावा केल्या आहेत. यात १ शतक आणि २० अर्धशतकांसह ११७ विकेट्स घेतल्या आहेत. सोफी बिग बॅश लीग, द हंड्रेड, डब्ल्यूपीएल आणि डब्ल्यूसीपीएलमध्ये खेळते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR