नवी दिल्ली : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) मणिपूर सरकार आणि राज्य पोलीस प्रमुखांना गोळीबारात १३ जण ठार झाल्याबद्दल नोटीस बजावली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी तैनात केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणार्या एजन्सी आणि सुरक्षा दलाची ही घटना मोठी “चुक” दर्शवते, असे एनएचआरसीने एका निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सांगितले की, या वर्षी मे महिन्यात मणिपूर राज्यात तणाव निर्माण झाल्यापासून शांतता असलेल्या भागात १३ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी आहे.
मणिपूरच्या तेंगनौपाल जिल्ह्यातील सायबोलजवळील लेथू गावात झालेल्या गोळीबारात १३ लोक ठार झाल्याच्या मीडिया वृत्ताची मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. ही घटना ४ डिसेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. आयोगाला असे आढळून आले आहे की जर मीडिया रिपोर्टमधील मजकूर खरा असेल तर तो मानवी हक्क उल्लंघनाचा गंभीर आणि चिंतेचा विषय आहे. त्याअंतर्गत राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागविण्यात आले आहे. दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल दिला जाईल, असे निवेदनात म्हटले आहे. लीथू हे गाव तेंगनौपाल जिल्ह्यात वसलेले आहे. मणिपूरमधील वांशिक संघर्षादरम्यान या भागावर कोणताही परिणाम झाला नाही.