35.4 C
Latur
Tuesday, April 15, 2025
Homeराष्ट्रीयएनआयए राणाच्या आवाजाचे नमुने घेणार

एनआयए राणाच्या आवाजाचे नमुने घेणार

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए)ने रविवारी तिस-या दिवशी तहव्वुर राणाची चौकशी केली असून २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या आवाजाचे नमुने घेतल्या जाणार असल्याची माहिती आहे. नोव्हेंबर २००८ च्या हल्ल्यादरम्यान तहव्वुर फोनवरून सूचना देत होता का, हे एनआयए तपासणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी एनआयएच्या चौकशीदरम्यान एका एम्प्लॉई बी चे नाव समोर आले होते, ज्याने राणाच्या सांगण्यावरून हेडलीला ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्समध्ये मदत केली होती.

आता एनआयए राणा आणि एम्प्लॉई बी यांना समोरासमोर बसवून चौकशी करेल. एजन्सीच्या मते, एम्प्लॉई बी ला दहशतवादी कटाची माहिती नव्हती. तो राणाच्या सूचनेनुसार हेडलीसाठी स्वागत, वाहतूक, निवास आणि कार्यालयाची व्यवस्था करत असे डेव्हिड हेडली हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड होता.

१० एप्रिल रोजी तहव्वूरला एका विशेष विमानाने अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. यानंतर त्याला १८ दिवसांसाठी एनआयए कोठडीत पाठवण्यात आले आहे. कोठडीदरम्यान, एनआयए दररोज राणाच्या चौकशीची डायरी तयार करेल. भारतात प्रत्यार्पण टाळण्यासाठी, राणाने २१ जानेवारी रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये भारतातील ३३ आजार आणि छळाचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्या वकिलाने लिहिले होते की राणा पार्किन्सन, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, दमा, टीबी आणि मूत्राशयाचा कर्करोग यासह अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त आहे.

राणा मुस्लिम आणि पाकिस्तानी वंशाचा असल्याने त्याला भारतात छळाचा सामना करावा लागू शकतो, असा दावाही त्यांनी केला. परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने ११ फेब्रुवारी रोजी प्रतिसाद देत हे दावे फेटाळून लावले आणि म्हटले की प्रत्यार्पण सर्व आंतरराष्ट्रीय नियमांनुसार होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR