31.7 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeक्रीडानितेश कुमार बॅडमिंटनच्या फायनलमध्ये

नितेश कुमार बॅडमिंटनच्या फायनलमध्ये

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताच्या नेमबाजांनी आणि बॅडमिंटनपटूंनी दमदार कामगिरी आत्तापर्यंत केली आहे. आता भारताचा २९ वर्षीय खेळाडू नितेश कुमारने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

नितेशने पुरुषांच्या एकेरी एसएल३ प्रकारात उपांत्य सामन्यात जपानच्या दायसुके फुजिहाराला २१-१६, २१-१२ अशा फरकाने विजय मिळवला. यामुळे त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले असून आता तो सुवर्णपदकासाठी खेळणार आहे.

नितेशला अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध खेळायचे आहे. हा सामना २ सप्टेंबर रोजी होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR