39.6 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या अश्रूंवर टीका करणा-यांना माफी नाही

माझ्या अश्रूंवर टीका करणा-यांना माफी नाही

यवतमाळ : कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्यावर घरची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारीही आली. या जबाबदा-या सांभाळत असताना दोन अश्रू डोळ्यातून निघाले तर… माझ्या अश्रूंवर टीका केली, त्यांना माफी नाही. मला त्यांनी माफ करावं हा विषय नाही पण मी त्यांना माफ करेन, प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान, प्रतिभा धानोरकर यवतमाळमध्ये बोलताना म्हणाल्या, ‘कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. कुटुंबप्रमुख गेल्याने माझ्यावर घरची जबाबदारी आणि राजकीय जबाबदारीही आली.

या जबाबदा-या सांभाळत असताना दोन अश्रू डोळ्यातून निघाले तर विरोधी पक्षाचे उमेदवार त्या अश्रूंचे भांडवल करतो, याची मला कल्पना नव्हती. मी उमेदवार आणि एक विधवा महिला म्हणून त्यांना माफ करणार नाही तर माझ्या भागातील सर्वच महिला त्यांना माफ करणार नाहीत. हा अपमान फक्त माझ्या एकटीचा नाही तर माझ्या भागातील प्रत्येक महिलेचा आहे’, असे धानोरकर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR