23 C
Latur
Thursday, March 6, 2025
Homeमहाराष्ट्रबिंदी नाही, मंगळसूत्र नाही, नव-याने रस का दाखवावा?

बिंदी नाही, मंगळसूत्र नाही, नव-याने रस का दाखवावा?

न्यायालयाचा महिलेला सवाल?

पुणे : महाराष्ट्रातील पुणे जिल्हा न्यायालयात एका महिलेने तिच्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले, जिथे न्यायाधीशांनी महिलेला सांगितले मी पाहू शकतो की तुम्ही मंगळसूत्र किंवा बिंदी लावलेली नाही. जर तुम्ही विवाहित आहात तर अशा गोष्टी आवश्यक आहेत. जेणे करून तुमच्या पुरूषाने तुमच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे.

लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंकुर आर. जहागीरदार नावाच्या एका वापरकर्त्याने या प्रकरणासंदर्भात एक पोस्ट शेअर केली. ते व्यवसायाने वकील आहेत. पोस्टनुसार, ती महिला तिच्या पतीपासून वेगळी राहत होती आणि तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायाधीशांच्या अशा प्रश्नांमुळे तिला अस्वस्थ वाटले आणि ती रडू लागली.

जहागीरदार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असाच आणखी एक किस्सा शेअर केला. ज्यामध्ये न्यायाधीशांनी भरणपोषणाच्या वादात महिलेला विचित्र सल्ला दिला. न्यायाधीश म्हणाले जर एखादी स्त्री चांगली कमाई करत असेल तर ती नेहमीच तिच्यापेक्षा जास्त कमाई करणारा नवरा शोधेल. पण एक चांगला कमाई करणारा माणूस घरातल्या भांडी धुणा-याशीही लग्न करू शकतो. पुरूष किती लवचिक असतात ते पहा. तुम्ही थोडी लवचिकता देखील दाखवली पाहिजे. इतके कठोर होऊ नका.

न्यायालयात न्यायाधीशांच्या टिप्पणीमुळे लग्न मोडले
बार अँड बेंचशी संवाद साधताना, वकील अंकुर आर. जहागीरदार म्हणाले की, या प्रकरणातील महिला न्यायाधीशाच्या वागण्यामुळे असे वातावरण निर्माण झाले की लग्न मोडले. त्यांनी सांगितले की, मी माझ्या पोस्टमध्ये उल्लेख केलेली दुसरी घटना माझ्या स्वत:च्या अशिलाची आहे आणि हे प्रकरण अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.

वाटाघाटी प्रक्रियेबद्दल प्रश्न
जहागीरदार म्हणाले की, अशा परिस्थितीत विश्वास तुटतो, ज्यामुळे तोडगा निघण्याची शक्यता नष्ट होते. न्यायालयात महिलांना आदरयुक्त वागणूक देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. ते म्हणाले की, मध्यस्थीचा उद्देश तोडगा काढणे आहे. आणि कोणालाही मानसिक त्रास देऊ नये.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR