पुणे : काल संसदेच्या आवारात चार जणांनी संसद परिसरात धुडगूस घातला. दोघांनी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून खासदारांच्या बाकांवर उडी मारत गोंधळ घातला. तर एक महिला आणि तरुणाने संसदेच्या बाहेर स्मोक कँडल फोडल्या. यात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील झरेगावचा तरुण अमोल शिंदे याने संसद परिसरात गोंधळ घातला.
अमोल शिंदे याला महाराष्ट्रातील प्रसिद्ध वकील कायरेशीर मदत करणार आहेत. अमोल शिंदे याला आपण मदत करणार असल्याचे अॅड. असिम सरोदे यांनी जाहीर केले आहे. फेसबुक पोस्ट लिहित असिम सरोदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. अमोल शिंदेला कायदेशीर मदत करण्याचे असिम सरोदेंनी सांगितले आहे.
संसदेत घुसखोरी करणा-या अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार आहे. अमोल शिंदे या तरुणाला शिक्षा झाली पाहिजे. त्याने निषेध करण्याचा निवडलेला पर्याय हा चुकीचा आहे. मात्र अमोल शिंदेवर लावलेली कलमं चुकीची आहेत. त्यामुळे अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याचे असिम सरोदे यांनी जाहीर केले आहे.