28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयराममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही

राममंदिर प्रतिष्ठापनेचे नेत्यांना निमंत्रण नाही

नवी दिल्ली/अयोध्या : अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी होणा-या राममंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी देशातील कोणतेही मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यपालांसह कोणत्याही नेत्याला निमंत्रण दिले जाणार नाही. श्री राम मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील. अर्थात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमास उपस्थित राहतील. ते आयोजन समितीत आहेत.

रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, राममंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी ८००० विशिष्ट लोकांना निमंत्रण पाठविण्यात येईल. यात ४००० साधुसंतांचा समावेश असेल. सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमात मुख्य अतिथी असणार आहेत. आंबेकर यांनी सांगितले की, संघ व विंिहप कार्यकर्ते एक जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत देशाच्या प्रत्येक गावात, शहरात राम मंदिराच्या छायाचित्रासह अक्षता घेऊन निमंत्रण देण्यास जाणार आहेत. राममंदिर आंदोलनाशी संबंधित सर्व प्रमुख लोकांना बोलावण्यात येणार आहे. नेत्यांना निमंत्रण न देण्यामागचे कारण सांगताना अंबेकर म्हणाले की, मंदिराचे काम अद्याप पूर्ण नाही. व्हीआयपीच्या येण्याने व्यवस्थेवर ताण पडू शकतो.

अयोध्या सजली
अयोध्येतील रामजन्मभूमी येथे उभारण्यात येणा-या राममंदिरातील गर्भगृहात दिवाळीनिमित्त झेंडूच्या फुलांच्या हारांची सजावट करण्यात आली आहे. तसेच भगव्या रंगाच्या पताकांनी हा परिसर सुशोभित केला आहे. राममंदिराच्या उभारणीत व्यग्र असलेल्या कामगारांनीही या मंदिरात सजावट करण्यास हातभार लावला. अयोध्येतील शरयू तीरावर लाखो पणत्या उजळून यावेळीही विक्रम करण्यात येणार आहे. त्याची तयारी झाली आहे.

काँग्रेसच्या दाव्यावर आरएसएसला नाही आक्षेप
अंबेकर म्हणाले की, एक जानेवारीपासून पूर्ण देशात राममय वातावरण तयार होत आहे. ५०० वर्षांच्या लढाईनंतर हा शुभ दिन येत आहे. आता काँग्रेसचे नेतेही दावा करत आहेत की, राममंदिर आमच्यामुळे झाले आहे. राजीव गांधी यांनी त्यावेळी कुलूप उघडले होते. अंबेकर म्हणाले की, संघाला या दाव्याबाबत कोणताही आक्षेप नाही. संघ व विंिहपने हा मुद्दा हाती घेऊन निष्कर्षापर्यंत नेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR