18.7 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeपरभणीन. प. निवडणुकीत विरोधकांना शुन्यावर बाद करतो : माजी आ. दुर्राणी

न. प. निवडणुकीत विरोधकांना शुन्यावर बाद करतो : माजी आ. दुर्राणी

पाथरी : मागील ३५ वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून पाथरी शहरातील सर्वधर्म समभाव जपला. खेडेगाव सारखी परिस्थिती असलेल्या पाथरीचा मोठा विकास केला. यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. विकास करत असताना जाती धर्माचा विचार केला नाही. आगामी नगर परिषद निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकून उमेदवारांना शुन्यावर बाद करतो अशी भीमगर्जना माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी केली आहे.

दर्गा मोहल्ला येथील पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. पुढे बोलताना आ. दुर्राणी म्हणाले की, माझा विरोधक म्हणतो की आम्ही पाथरीसाठी काय केले? माझ्यावर प्रेम करणारी जनता आज शेकडोच्या संख्येने येथे उपस्थित आहे. आम्ही लोकांची कामे केली नसती तर एवढ्या प्रमाणात लोक इथे आली असते का? असे म्हणत येणा-या पाथरी नगरपालिका निवडणुकीत जनतेच्या आशीवार्दाने पुन्हा आमचे सर्व उमेदवार निवडून आणतो आणि विरोधकांना पुन्हा शून्यावर बाद करतो अशी भीमगर्जना माजी आ. दुर्राणी यांनी केली आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन बबलू कुरेशी, हबीब कुरेशी, मुस्तफा अन्सारी, सगीर अन्सारी यांनी केले होते. यावेळी माजी आ. दुर्राणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अलीम कुरेशी, कोराख कुरेशी, मुकीद कुरेशी, शोएब कुरेशी, सत्तार कुरेशी, जावेद कुरेशी, बिट्टू कुरेशी, इमरान खान, खैसर कुरेशी, शकी कुरेशी, शकील अन्सारी, अमजद खान, शेख फेरोज, सगीर अन्सारी इत्यादीसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR