मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि मोदींना पाठिंबा दिला. त्यामुळे बिहारमधील कार्यकर्ते जे मुंबईमध्ये राहतात आणि दक्षिणेतील जे कार्यकर्ते आहेत, ज्यांना भाजप जवळची वाटत होती त्यांना असुरक्षित वाटू लागले असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. अॅड. आंबेडकर हे अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईसारख्या शहरात मनसे किंवा शिवसेना यांनी अगोदर आंदोलन उभे केले होते. ते म्हणजे लुंगी हटाव, पुंगी बजाव. त्यानंतर उत्तर भारतीयांच्या विरोधातले आंदोलन उभे केले. मनसेने धारावी या ठिकाणी छट् पूजेला विरोध केला. बिहारमधील लोकांना मारल्याची आठवणही आंबेडकर यांनी करून दिली.