28.2 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeमहाराष्ट्रआयकरच्या हाती काहीच लागले नाही : संजीवराजे

आयकरच्या हाती काहीच लागले नाही : संजीवराजे

फलटण : प्रतिनिधी
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटणमधील घरावर आयकर विभागाने छापा टाकला. आजचा कारवाईचा पाचचा दिवस होता. पाच दिवसानंतर ही कारवाई संपली.

आयकर विभागाने बुधवारी ही कारवाई सुरू केली होती. आयकर विभागाचे अधिकारी निघून जाताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. पाच दिवसांच्या चौकशीतून आयकर विभागाच्या हाती काहीच लागले नाही, असे संजीवराजे निंबाळकर म्हणाले.

आयकर विभागाची चौकशी पहिल्या दोन दिवसांत पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांचे जे पेपरवर्क होते, त्याला जास्त वेळ लागल्याचे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. आयकर विभागाला या चौकशीतून काहीही सापडले नाही. त्यांनी माझ्याकडून काहीही जप्त केले नाही. ही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती. गोविंद मिल्क संदर्भात ही कारवाई होती, असे संजीवराजे निंबाळकर म्हणाले. राजकीय हेतूने ही कारवाई झाली आहे का? याबाबत विचारले असता संजीवराजे म्हणाले की, याबाबत सांगणे कठीण आहे. सध्या काहीही घडू शकते. पक्ष बदलाबाबत फक्त चर्चा सुरु असल्याचेही संजीवराजे म्हणाले.

बुधवारपासून सुरू झालेली चौकशी आज पाचव्या दिवशी देखील सुरूच होती. गेल्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. मात्र या दरम्यानच्या काळातच त्यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला. आयकर विभागाच्या चौकशीमध्ये काय समोर आले हे अद्याप समजू शकलेले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR