28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाच्या पदाधिका-यांना नोटीस

ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना नोटीस

स्मृतिस्थळावरील राडा प्रकरण

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळावर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांमध्ये राडा झाला. पोलिसांनी आतापर्यंत याप्रकरणी ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पार्कवरील राड्याप्रकरणी पोलिसांकडून ठाकरे गटाच्या पदाधिका-यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. प्राथमिक चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात जाणार आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्यास गोंधळ होणार असा अंदाज होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले. मुख्यमंत्री अभिवादन करून बाहेर पडताच ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि अनिल परब बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर दाखल झाले. परब दाखल झाले आणि याच वेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.

सूडबुद्धीने नोटीस पाठवल्याचा संजय राऊतांचा आरोप
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शिंदे गटानं केला आहे. स्मृतीस्थळासमोर राडा सुरू होता तेव्हा सुरू असलेला राडा थांबवण्याऐवजी दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत होते. संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, सुरुवात कोणी केली त्यांच्यावरती नोटीस कारवाई का केली नाही ? मुंब्रा शाखेवरती ज्यांनी बुलडोजर चढवला त्याच्यावरती कारवाई का केली गेली नाही? शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर गद्दार आणि बेईमान लोकांनी पाय ठेवू नये. बाळासाहेब ठाकरे कायम गद्दारपणा तुडवा असे म्हणायचे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR