32.2 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeसोलापूरशिक्षक भरती बिंदुनामावली विषयी अधिवेशनात लक्षवेधी

शिक्षक भरती बिंदुनामावली विषयी अधिवेशनात लक्षवेधी

सोलापूर : शिक्षक भरतीपूर्व सध्या आंतरजिल्हा बदलीचा शेवटचा टप्पा राबविला जात आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेतर्फे जवळपास ७०० शिक्षकांची भरती होणार आहे. मात्र, जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातील ६२० रिक्त पदांमध्ये ‘एनटी’ संवर्गासाठी एकही जागा नसल्याचे बिंदुनामावलीत नमूद आहे. त्यासंदर्भात अधिवेशनात मुद्दा उपस्थित झाला असून त्यावर नागपुरात बैठक बोलावण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने त्यांच्याकडील शाळांमधील कार्यरत शिक्षक व रिक्त पदांची बिंदुनामावली तयार केली. त्यानंतर पुण्यातील मागासवर्गीय कक्षाकडून ती तपासून अंतिमही केली. परंतु, मागील सात वर्षांत शिक्षक भरती झाली नसतानाही जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये एनटी- अ, ब व क या संवर्गासाठी एकही जागा रिक्त नसल्याचे त्या बिंदुनामावलीतून स्पष्ट झाले आहे. त्यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी अधिवेशनात लक्षवेधी मांडली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले मागील बिंदुनामावली व सध्या तयार करून मागासवर्गीय कक्षाने अंतिम केलेली बिंदुनामावली घेऊन नागपूरला रवाना झाले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या ६२० जागा रिक्त आहेत. त्यात एसटी संवर्गाच्या ४३०, एससी- ५२, ओबीसी – ४२, खुल्या प्रवर्गातील ३४ व ‘ईडब्ल्यूएस ‘मधील ६२ जागांचा समावेश आहे. यामध्ये एनटी प्रवर्गातील एकही पद रिक्त कसे काय नाही, असा प्रश्न लक्षवेधीतून विचारण्यात आला आहे. त्यावर आता संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रांच्या आधारे त्यासंदर्भातील माहिती द्यावी लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR