पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहातून पुन्हा एकदा कैदी पळाल्याची घटना घडली. कुख्यात गुंड आशिष जाधव येरवडा जेलमधून पळाला.
त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.
जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आले होते. काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव दिसला नाही.